
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे डिचोलीचा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
सन १९८० पासून डिचोलीच्या नागरिकांतर्फे गणेशमूर्ती पूजनाची परंपरा सुरू झाली. या गणेशमूर्ती पूजनाच्या परंपरेला आज ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाचे सरकार दरबारी अधिकृत रजिस्ट्रेशन ७ ऑगस्ट १९८३ रोजी झाले.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत मंडळातर्फे दरवर्षी भजन, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, फुगडी तसेच अनेक मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षी नवीन देखावा आणि आकर्षक सजावट करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. गोवा राज्याच्या कला व सांस्कृतिक खात्यातर्फे आयोजित देखावा स्पर्धेत आमच्या मंडळाने अनेक वेळा पारितोषिके मिळवून डिचोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मंडळाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे दरवर्षी नवीन अध्यक्षाची निवड करण्याची अखंडित परंपरा.
दरवर्षी गोव्यातील हजारो गणेशभक्त डिचोलीच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. भक्तांच्या श्रद्धेने आणि आस्थेने आज आमच्या गणरायाची “नवसाला पावणारा गणपती” अशी संपूर्ण गोवाभर ख्याती निर्माण झाली आहे.
श्री गणेशाच्या चरणी ही गौरवशाली परंपरा अशीच अखंडित सुरू राहो, हीच प्रार्थना! 
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 2026
Lottery Draw Results



